CM Eknath Shinde : धर्माधिकारी कुटुंब भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारे दिपस्तंभ आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यामुळं पुरस्काराची उंची वाढली आहे. महाराष्ट्राचा मान सन्मान वाढला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना आप्पासाहेबांना पुरस्कार दिला जात आहे, यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह आल्याबद्दल आभार
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एवढ्या महासागरासमोर काय बोलावं समजत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर श्री परिवारातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या विनंतीला मान देऊन गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले. सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जागेवरुन उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशिर्वाद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. इथं लहान मोठा कोणी नाही. सगळे सदस्य म्हणून समोर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी
आप्पासाहेबांची जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याचे उदाहरण आपण पाहत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड आप्पासाहेबांचे सदस्यच मोडू शकतात. या महासागरामध्ये तुमच्या सर्वात देव दिसत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आप्पासाहेबांचे योगदान मी कधीही विसरु शकणार नाही
धर्माधिकारी घराणे गेल्या 400 वर्षापासून समाजाची सेवा करत आहे. समाजातील अज्ञान दूर करण्याचे काम सुरु आहे. भरकटलेल्या लाखो कुटुंबाना दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं आहे. लाखो कुटुंबात माझेही एक कुटुंब होते. परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला, त्यावेळी आनंद दिघेंनी मला आधार दिला. तर आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्याचे मोठे योगदान आहे. ते मी कधीही विसरु शकणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. लाखो कुटंब वाचवण्याचे काम त्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुरस्कार देण्यासाठी जे आलेत ते कडवट देशभक्त आहेत. अमित शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 370 कलम रद्द केले तसेच राम मंदिराचे कामही त्यांच्या नेतृत्वात सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आप्पासाहेबांच्या कार्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मु पो रेवदंडा असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: