जवळपास 48 बनावट कंपन्यांच्या मदतीनं ही संपत्ती जमवण्यात आली होती. अशी धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी आयकर विभागानं नव्यानं छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटीसा बजावल्या आहेत. या कारवाईदरम्यान नाशिक आणि मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या संपत्तीवर टाच आणली आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भुजबळांच्या वकिलांकडून स्पष्टीकरण:
याबाबत भुजबळांच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'नव्यानं कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मागील महिन्यात याबाबतची अंतरिम नोटीस आली होती आणि त्याला उत्तरही देण्यात आलं आहे. ईडीनं याआधी ज्या संपत्तीवर टाच आणली होती त्याच संपत्तीवर पुन्हा जप्ती आणली आहे. भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही नवी संपत्ती जप्त करण्यात आलेली नाही.'
14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळांना अटक
पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.
ईडी तपास करत असलेलं प्रकरण मनी लाँडरिंग म्हणजे पैशाच्या अफरातफरीचं म्हणजेच ब्लॅकमनी व्हाईट करण्याचं आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे.
संबंधित बातम्या:
छगन भुजबळ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार!
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा : छगन भुजबळ