पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचं पद रद्द
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 05 Jul 2017 03:57 PM (IST)
पुणे : पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचं पद रद्द करण्यात आलं आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी किशोर धनकवडे यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या किशोर धनकवडे प्रभाग 39 अ मधून मागासवर्ग या आरक्षित जागेवर निवडून आले होते. परंतु धनकवडे यांनी नगरसेवकपदासाठी कुणबी असल्याचा खोटा दाखला दिला होता. त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी किशोर धनकवडे यांच्यावर कारवाई करत त्यांचं नगरसेवकपद रद्द केलं आहे.