एक्स्प्लोर

शिवसेनेशी 25 वर्षांचे ऋणानुबंध, काळजी असणारच : भुजबळ

रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांना पत्रकारांनी पहिली प्रतिक्रिया विचारल्यानंतर, ते म्हणाले, “झाले मोकळे आकाश, अशी भावना आहे.”

मुंबई : शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असे म्हणत छगन भुजबळ यांनी उद्ध ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, माझ्या पडत्या काळात शिवसेनेने दोन शब्द चांगले बोलले, याचे समाधानही आहे, असे भुजबळ म्हणाले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांना पत्रकारांनी पहिली प्रतिक्रिया विचारल्यानंतर, ते म्हणाले, “झाले मोकळे आकाश, अशी भावना आहे.” शिवसेनेबद्दल नेमकं काय म्हणाले? “पडत्या काळात शिवसेनेने शब्दांचा का होईना, आधार दिला. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलो आहे. त्यामुळे काळजी असणारच. ऋणानुबंध असतातच.” असे छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांची तब्येत कशी आहे? तसेच, “गेली साडेतीन महिने आजारपणामुळे त्रस्त होतो. अजूनही आजारपणातून पूर्णपणे बाहेर पडलो नाही. मात्र डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांनी जास्त त्रास घेऊ नका, असं सांगितलं आहे. परत हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल कदाचित. काही शस्त्रक्रिया कराव्या लागतील, त्यातून बरं वाटलं तर शंभर टक्के कार्यक्रमाला हजर राहणार.”, असे भुजबळांनी स्वत:च्या तब्येतीबाबत सांगितले. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन कुणाचा? जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असे भुजबळांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोप सभेला जाणार का? "प्रकृती ठीक झाली तर 10 जूनच्या सभेला जाईन. मला परत एकदा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यातून बरं वाटलं, तर शंभर टक्के मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर राहीन", असे छगन भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र सदन सुंदर, बनानेवाला अंदर “सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तुम्ही ते शोधायला हवं. महाराष्ट्र सदन आज सगळ्यांच्या पसंतीला उतरलं आहे. त्याचा मला आनंद आहे. भाजपच्या खासदारानं सांगितलं होतं, महाराष्ट्र सदन सुंदर आणि बनानेवाला अंदर.”, असे भुजबळांनी महाराष्ट्र सदन प्रकरणावर भाष्य केले. पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget