Vasant More On Maharashtra Political Crisis : मागील तीन वर्षात राज्यात झालेलं (vasant More ) सत्तानाट्य पाहून मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. ही फेसबुक पोस्ट पाहून थेट छत्रपती संभाजी महाराजांनी (Chatrapati sambhaji maharaj) त्यांना फोन केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी या फोन  रेकॉर्डिंगची क्लिप व्हायरल केली आहे. 'याला म्हणतात "राजा"...जनतेची आणि माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची किती काळजी आहे. माझ्या एका फेसबुक पोस्टमुळे राजेंनी ही काळजी व्यक्त केली. हे माझे भाग्य', अशा शब्दांत वसंत मोरेंनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहे.


Vasant More On maharashtra political Crisis : 'पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव...



'लांब कुठं तरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय', अशी पोस्ट फेसबुकवर केली होती. हीच पोस्ट पाहून संभाजीराजेनी त्यांना फोन केला आहे. त्यावर संभाजीमहाराजांनी त्यांची समजूत काढल्याचं दिसत आहे.  'कोणत्याही गोष्टी कितीही मनाला पटलं नाही तरीही तुमच्यासारखी लोकं राजकारणात सक्रिय असली पाहिजे. या परिस्थितीत आपल्या सारख्या लोकांनी खंबीर राहायला हवं. या सत्तानाट्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. आपण शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारी लोक आहोत त्यामुळे आपण या घाणेरड्या राजकारणात पडू नये', असा सल्ला संभाजीराजेंनी वसंत मोरेंना दिला आहे.


Vasant More On maharashtra political Crisis : संभाजीराजेंकडून फारयब्रॅंड वसंत मोरेंचं भरभरून कौतुक


याच फोनमध्ये संभाजीराजेंनी वसंत मोरेंच्या कार्याचं कौतुक केलं. पुण्यात तुमचं काम सॉलीड आहे. तुम्ही तुमच्या भूमिका परखडपणे मांडता. शहरपातळीवर काम करणारे लोक चांगलं काम करतात. त्यामुळे असंच काम करत रहा, असा सल्लाही त्यांनी वसंत मोरेंना दिला आहे. 


Vasant More On maharashtra political Crisis : वसंत मोरेंचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग


वसंत मोरेंचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी केलेली मदत, त्यांनी केलेले काम आणि केलेल्या टीका ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. शिवाय त्यांच्या परिसरात म्हणजेच पुण्यातील कात्रज परिसरात कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आढळलं तर मोरे त्याच्यावर परखड भूमिका घेतात आणि कारवाईचीदेखील मागणी करत असतात. त्यांच्या सोशल  मीडियावरील पोस्टची दखल घेत अनेकदा कारवाया करण्यात आल्या आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे वसंत मोरे कायम चर्चेत असतात. 



 


हे ही वाचा-


Raj Thackeray : राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली; राज ठाकरेंचा हल्लाबोल