एक्स्प्लोर

पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल, शारीरिक चाचणी परीक्षेच्या निकषांमध्ये बदल

पोलीस भरतीत आधी शारीरिक चाचणी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी 100 गुणांची होती, ती आता 50 गुणांची होणार आहे. लेखी परीक्षा आधी न घेता शारीरिक चाचणी व्हावी, अशी पोलीस भरतीसाठीच्या इच्छुक उमेदवारांची मागणी आहे.

औरंगाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतून पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यापूर्वी पुल अप्स आणि लांब उडीसाठी प्रत्येकी 20 गुण परीक्षांमध्ये देण्यात येत होते.

पूर्वीची शारीरिक चाचणी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी 100 गुणांची होती, ती आता 50 गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणी देण्यासाठी आता लेखी परीक्षा किमान 35 टक्के गुण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत.

त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरात प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:5 प्रमाणात शारीरिक चाचणी परीक्षेत पात्र ठरवण्यात येतील.

याआधी शारीरिक चाचणीतील गुण

पुरुष उमेदवार

5 किमी धावणे - 20 गुण

100 मीटर धावणे - 20 गुण

लांब उडी - 20 गुण

गोळा फेक - 20 गुण

पुल अप्स - 10 गुण

महिला उमेदवार

3 किमी धावणे - 25 गुण

100 मीटर धावणे - 25 गुण

गोळा फेक ( 4 किलो ) - 25 गुण

लांब उडी - 25 गुण

शारीरिक चाचणी परीक्षेतील बदल

पुरुष उमेदवार

1600 मीटर धावणे - 30 गुण

100 मीटर धावणे 10 गुण

गोळा फेक 10 गुण

महिला उमेदवार

800 मीटर धावणे - 30 गुण

100 मीटर धावणे - 10 गुण

गोळा फेक - 10 गुण

जुन्या शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी 5 किलोमीटर धावणे गरजेचे होते. मात्र आता केवळ 1600 मीटर धावावे लागणार आहे. याशिवाय महिलांसाठी 3 किलोमीटर धावल्यानंतर 25 गुण मिळायचे, मात्र आता 800 मीटर धावल्यानंतर 30 गुण मिळणार आहेत.

मात्र लेखी परीक्षा आधी न घेता शारीरिक चाचणी व्हावी, अशी पोलीस भरतीसाठीच्या इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. मात्र 2019 मध्ये होणारी पोलीस भरती या नव्या नियमानुसार होऊल. या नव्या पोलीस भरतीच्या नियमानुसार पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी, काही उमेदवार सुरुवातीला लेखी परीक्षेऐवजी शारीरिक चाचणी घेण्यावर ठाम आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...

व्हिडीओ

Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Repo Rate: गृहकर्जाचा हप्ता वाढणार,ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढण्याचा अंदाज, कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता
गृहकर्जाचा हप्ता वाढणार,रेपो रेट वाढल्यास गृह कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,RBI च्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
Embed widget