नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कैदेतून सुटका झालेले धुळ्यातील जवान चंदू चव्हाण यांची सेनेची नोकरी सोडण्याची इच्छा आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, त्यांनी वरिष्ठांना पत्र लिहून आपली नोकरी सोडण्याची इच्छा असल्याचं कळवलं आहे.


चंदू चव्हाण यांच्यावर सध्या मिलिट्री हॉस्पिटलच्या मनोचिकित्सा वॉर्डात उपचार सुरु आहेत. 24 वर्षीय चंदू यांनी 29 सप्टेंबर 2016 रोजी चुकून एलओसी पार केली. याच दिवशी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. चार महिने पाकिस्तानच्या कैदेत राहिल्यानंतर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात आली.

भारतात आल्यानंतर चंदू चव्हाण यांना न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागला, शिवाय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय शस्त्र घेऊन कॅम्प सोडल्यामुळे त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली. नंतर त्यांना अहमदनगरच्या लष्कर प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात आलं. चंदू यांना जवळपास तीन आठवड्यांपूर्वी मिलिट्री हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तिथे त्यांना मनोचिकित्सा वॉर्डात ठेवलं, जेणेकरुन त्यांची देखरेख करता येईल.

''मी गेल्या 20 दिवसांपासून मिलिट्री हॉस्पिटलच्या मनोचिकित्सा वॉर्डमध्ये आहे. तीन दिवसांपूर्वी वरिष्ठांना पत्र लिहून नोकरी सोडण्याची इच्छा असल्याचं कळवलं. माझ्यासोबत जे झालंय, त्याच्यानंतर माझ्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आता सर्वसामान्यांचं जीवन जगण्याची इच्छा आहे,'' असं चंदू चव्हाण म्हणाले.

कोण आहेत चंदू चव्हाण?

चंदू चव्हाण मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. 22 वर्षीय चंदू यांनी सीमा ओलांडण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.

संबंधित बातम्या :

जवान चंदू चव्हाणांकडून पाकिस्तानची पोलखोल

पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांना भारताकडून 3 महिन्यांची शिक्षा

जवान चंदू चव्हाणांना कारावासाची शिक्षा नाही : सूत्र

पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका 

पाकच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार!

भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली 

22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं

EXCLUSIVE – पाकिस्तानच्या जेलमध्ये काय घडलं? जवान चंदू चव्हाण यांच्याशी बातचीत