एक्स्प्लोर

राज्यातील 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त : चंद्रकांत पाटील

राज्यातील 22 हजार 795 किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासनही त्यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर : आजपर्यंत राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात आपण रस्त्यावरुन प्रवास केला. यादरम्यान, केलेल्या पाहणीत 22 हजार 795 किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासनही त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सगळ्या जिल्ह्यात प्रवास केला. यावेळी 36 जिल्ह्यातील 30 मी स्वत: जाऊन रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहाणी केली. यातील 17 जिल्ह्यातील रस्ते शंभर टक्के खड्डेमुक्त झाले आहेत. आम्ही राज्यातील एकूण 22 हजार 795 किमी रस्त्याचे खड्डे भरले असून, आज मध्यरात्रीपर्यंत खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण होईल." ते पुढे म्हणाले की, "राज्यातील एकूण 23 हजार 381 किमी लांबी रस्त्यावरील 22 हजार 736 रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्डे भरण्याचं काम सुरु आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम झाले असून, आज मध्यरात्री 100 टक्के खड्डे भरले जातील." दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. "मी कधी हेलिकॉप्टर मधून प्रवास केला? हे सुप्रिया ताईंनी दाखवून द्यावं," असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. तसेच, "त्या जेव्हा मला यवतमाळला भेटल्या होत्या, तेव्हा माझ्या कामावर समाधान व्यक्त केलं होतं," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय, जर काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी सांगावं. जिथे खड्डा आहे असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन, आणि खड्डा भरून देईन, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, पाटील यांनी खड्डेमुक्तीसाठी दिलेल्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया देताना, हे सरकार खोटारडं असल्याचा आरोप केला. संबंधित बातम्या खड्डेमुक्त रस्त्याच्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Maharashtra Breaking LIVE: हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget