Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोलापूरमध्ये (Solapur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावरून भाजपचे प्रधेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.  


चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. 


गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है


लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला (Congress) धडा शिकवला.


राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही


निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. 


राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 90 टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा 25 उद्योगपतींना दिलाय. देशातील जनतेने आता मोदींना ओळखले आहे. त्यामुळेच मोदी घाबरलेत. लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटतेय आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हे पुन्हा पाकिस्तान, दोन समाजामधील द्वेषाची, खोटेपणाची भाषा वापरताय, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोलापूर येथील जाहीर सभेतून केली. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rahul Gandhi: राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा, सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं आश्वासन


दर महिन्याला टकाटक... टकाटक... टकाटक...; अमरावतीत राहुल गांधींची घोषणा, उपस्थितांचा जल्लोष