Chandrashekhar Bawankule On Uddhhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhhav Thackeray) कोकणातल्या सभेत केली. मात्र मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो-उदो करण्यापेक्षा रामराम करणं हे कधीही चांगलंच आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले, पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे.
फक्त मतं मिळविण्यासाठी कोकणची आठवण - चंद्रशेखर बावनकुळे
सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण आल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात. तर देवेंद्रजी आणि राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणीमाणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणीमाणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
सिंधुदुर्ग- रत्नागिरीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे म्हणाले की, आजही आपण भूत पाहिला की सर्वप्रथम राम राम म्हणतो. तसेच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम राम म्हणू लागलेत, असे ठाकरे म्हणाले होते. यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या