पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या की सगळ्यांना निकालाची उत्सुकता असते. या निकालावर भवितब्य अवलंबून असते. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याचं नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा (Maharashtra Board HSC Result 2023) निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे त्या दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे 10वी 12वी दोन्ही परीक्षांचा निकाल वेळेपूर्वी लागण्याची शक्यता किंवा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. यासंदर्भातील सगळा आढावा बोर्डाकडून घेतला जात आहे. याच आढाव्यावरुन निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

यावेळी राज्यात दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.  इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. तर इयत्ता बारावीसाठी 12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम जोमात सुरु आहे. त्या उत्तर पत्रिकेच्या तपासण्याकडे बोर्डाचं लक्ष आहे. रोज माहिती घेतली जात आहे. त्यानुसार निकालाची तारीख सांगण्यात आली आहे. 

Continues below advertisement

मागच्या वर्षी दहावीचा निकाल 2 जूनला लागला होता. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला होता. त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला होता. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला होता. मागच्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल  91.25 टक्के लागला होता. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला होता तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला होता. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती.

विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. 

इतर महत्वाची बातमी-

माहेरवाशीण लेकीला साडी चोळी करा पण बटण दाबायच्या भानगडीत पडू नका; अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा

Amol Kolhe And Ajit Pawar : अमोल कोल्हेंचे अजित पवारांना धडाधड प्रश्न, म्हणाले दादा सांगा बेरोजगारी…