Sharad Pawar Supriya Sule ABP Majha Mahakatta मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावर (Majha Maha katta) हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर दिलखुलास चर्चा करत अनेक रोखठोक उत्तर दिलीत. देशाचा आणि राज्याच्या राजकीय पटलावर गेली कित्येक वर्ष आपल्या राजकीय कारकि‍र्दीतून देशपातळीवर शरद पवारांनी एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अशाच अनेक प्रसंगांचा उलगडा आज शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी माझाच्या महाकट्ट्यावर केलाय. यावेळी शरद पवार यांना आपल्या आवडता बुद्धीबळ खेळा विषयी विचारले असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत राजकारण आणि बुद्धीबळाची सांगड घालत दिलखुलास उत्तर दिलेत.    


बुद्धीबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोण?


यावेळी शरद पवार  म्हणाले की, असंय की मी काही बुद्धीबळ फार भारी खेळतो असं नाही. गंमतीने कधी मला वेळ मिळाला तर मी खेळायला  बसतो. त्याच्यात दोन तीन गोष्टी असतात, तो म्हणजे उंट हा तिरकाच चालतो. राजकारणात कोण उंट आहे हे लक्षात ठेवावं लागतं. घोडा हा अडीच घरं चालतो, तर अडीच घरं चालणारा घोडा आपल्या आजूबाजूला कोण आहे ते बघावं लागतं. अशा शब्दात शरद पवारांनी उत्तर दिले आहे.


'वजीर' माझा आवडता - शरद पवार 


दरम्यान, बुद्धीबळ खेळामध्ये असलेल्या उंट, घोडा, राजा, राणी इत्यादि पैकी तुमचा आवडता आणि कोणाला सोबत घेऊन बुद्धीबळ खेळू वाटतं, असा प्रश्न केला असता शरद पवारांनी उत्तर देत म्हणाले की, 'वजीर' हा माझा आवडता आहे. दरम्यान, आज दिवसभर एबीपी माझावर गप्पांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर 'माझा महाकट्टा' कार्यक्रमांचं प्रसारण केलं जाणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या नामवंताशी मनमोकळा संवाद साधला जाणार आहे. तसेच, माझा कट्ट्याचा 12 वर्षांचा प्रवासाचा हा महासोहळा दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. 


लोक हेच शरद पवार यांचे टॉनिक


शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील राजकरणापलीकडील नात्याविषयी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक हेच शरद पवार यांचे टॉनिक आहे.  त्यामुळं ते लोकांमध्ये फिरत असतात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आदर्श वडिलांपेक्षा शरद पवार हे आदर्श आजोबा असल्याचेही सुळे म्हणाल्या. शरद पवार हे कामासाठीच जन्माला आल्याचेही भाष्य त्यांनी केलंय.


इतर महत्वाच्या बातम्या