एक्स्प्लोर

मुलांना शिकायला परदेशात पाठवताय? ही बातमी पाहाच

परदेशात शिक्षण घेताना ऐऱ्यागैऱ्या एजंटवर विश्वास ठेवाल तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावू लागू शकते.

नागपूर : परदेशात शिक्षण घेऊन चांगलं करिअर घडवण्याचं स्वप्न अनेक मुलं बघतात. मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी अनेक पालक पोटाला चिमटा काढून पै पै जमवतात. मात्र परदेशात शिक्षण घेताना ऐऱ्यागैऱ्या एजंटवर विश्वास ठेवाल तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावू लागू शकते. विदर्भासह राज्यभरातल्या 140 विद्यार्थ्यांवर असंच एक मोठं संकट ओढावलं होतं. ते संकट तुमच्यावर किंवा तुमच्या मुलांवर ओढवू नये, असं तुम्हाला वाटत असेल तर हा रिपोर्ट नक्की पाहा. चंद्रपूरची ऐश्वर्या खोब्रागडे... नीटच्या परीक्षेत अपयश आल्याने खचली होती. पण वे टू अब्रॉड या कन्सल्टन्सीची जाहिरात आली. त्यात थेट यूक्रेनमध्ये एमबीबीएस करण्याची संधी होती. पुण्यात सेमिनारही अटेंड केला आणि एजंट संदीप सिंहच्या सांगण्यावरुन आर. जे. ट्रेडर्स या कंपनीच्या नावे 2 लाख 10 हजार भरले. थेट यूक्रेनमध्ये अॅडमिशन मिळाल्याने सगळेच खूश होते. पण ऐश्वर्या यूक्रेनमध्ये पोहोचली आणि तिला धक्काच बसला. ऐश्वर्याने अॅडमिशनसाठी तब्बल 2 लाख 10 हजार रुपये भरले होते. पण त्यातला एकही नवा पैसा एजंटने कॉलेजमध्ये जमा केला नव्हता. त्यामुळे कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला. फसगत झालेली ऐश्वर्या एकटीच नव्हती, तर तब्बल 140 मुलांच्या बाबतीच हेच झालं होतं. तिकडे ऐश्वर्याने ट्वीट करुन आपली व्यथा मांडली. इकडे ऐश्वर्याच्या पालकांनी आमदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या. मुलांच्या व्यथांच्या ट्वीट्सची जणू चेन तयार झाली. ऐश्वर्याचा ट्वीट भांगडियांनी रीट्विट केला. भांगडियांचा ट्वीट नितीन गडकरींनी सुषमा स्वराज यांना टॅग केला आणि त्यानंतर थेट परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप केला. ऐश्वर्याच्या एका ट्वीटमुळे यूक्रेनमधल्या 140 भारतीय विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. त्यामुळे तुमची मुलं थेट परदेशी शिकायला जाणार असतील तर आधी पूर्ण खातरजमा करा आणि मगच सीमोल्लंघन करा.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget