एक्स्प्लोर

ताडोबातील 'गजराज'च्या हल्ल्यात माहुताचा मृत्यू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका बिथरलेल्या हत्तीने केलेल्या हल्ल्यात माहुताचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका हत्तीने केलेल्या हल्ल्यात माहुताचा मृत्यू झाला आहे. जानकीराम मसराम (वय 45 वर्ष)या घटनेत मृत्यू झालेल्या माहुताचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोहुर्ली येथे घडली. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी आणि इतर कामासाठी काही हत्ती मोहर्ली येथील कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांत या हत्तीवरुन सफारी केली जायची. सद्यस्थितीत एका मादी हत्तीला एक वर्षाचे पिल्लू असून, दुसरी मादी हत्ती गरोदर आहे. या काळात मादी हत्ती ही नर हत्तीला जवळ येऊ देत नाही. त्यामुळे गजराज नावाचा नर हत्ती बिथरला असावा, असे मत व्यक्त केले जात आहे. आज दुपारी अचानक अमोल मंगाम यांच्यावर गजराज चाल करुन गेला. अमोल यांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना गजराज हत्तीने माहुताला सोंडेत पकडून जमिनीवर आदळले, वर पायदळी देखील तुडवले. यामुळे मसराम यांचा जागीच मृत्यू ओढविला आहे. हे प्रत्यक्ष घटनास्थळ व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली या प्रसिद्ध प्रवेशद्वारा शेजारी आहे. बिथरलेला हत्ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही जवळ येऊ देत नव्हता, असे वनाधिकार्‍यांनी सांगितले. ताडोबातील हत्ती सफर - शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे ताडोबाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या प्रकल्पात वाघांशिवाय बिबट, गवा, सांबर, चितळ, रानडुक्कर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. 1 मार्च ते 31 मे या तीन महिन्यांच्या कालावधीत ताडोबात पर्यटकांची गर्दी असते. काही वर्षांपासून ताडोबामध्ये परदेशी आणि देशातील पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरु करण्यात आली होती. संबंधित बातम्या - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये वाघिणीची शिकार

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget