Chhatrapati Sambhajinagar crime: छत्रपती संभाजी नगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. किरकोळ वादातून तीन जणांनी 57 वर्षाच्या व्यक्तीला भर चौकात पेट्रोल टाकून पेटवले. यात या व्यक्तीचे शरीर 35 टक्के भाजले असून त्यांचे घाटीत उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात गारखेडा परिसरातील त्रिशरण चौकात मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. महिपाल सिंग रणधीर सिंग गौर असे भाजलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी आदिल शाहरुख शेख, कृष्णा समाधान शिंदे व शेख मुमताज या तिघांना अटक केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात तलवारीची दहशत, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणे, उद्योजकाला अडवून मारहाण करणे, कट लागला म्हणून हत्या करणे असे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान सोमवारी आकाशवाणी चौकात तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे संभाजीनगर शहर पोलिसांचा धाक संपला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
कामावरून काढून टाकल्याच्या रागात उद्योजकाला भर दुपारी बेदम मारहाण
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भर दुपारी एका उद्योजकाला झालेल्या मारहाणीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. नागेश्वर मुळे असे मारहाण करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे.
हेही वाचा :
कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी मिळून केली बेदम मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद
हॉटेलच्या बिलावरुन वाद, टोळक्याकडून मालकावर तलवारीनं हल्ला, घटना CCTV मध्ये कैद