छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरुनच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. “उलटा निर्णय देणारे आणि ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार” असा खोचक टोला खैरे यांनी लगावला आहे. 


दरम्यान यावर बोलतांना खैरे म्हणाले की, "मुंबई दक्षिण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षापासून शिवसेना तिथे निवडून येत आहे. पण ते जर म्हणत असतील तिथून लोकसभा लढायची, तर ज्या अध्यक्षांनी उलटा निर्णय दिला आहे. त्यांच्या बाबतीत लोकांचं मत खराब झालेला आहे. पुतळे जाळले, चपला मारल्या, फोटो जाळले यानंतर त्यांना कोण निवडून देईल. आमचे अरविंद सावंत जबरदस्त काम करत आहे. हाडाचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ आहे. त्यांची जबरदस्त तयारी त्या भागात आहे आणि तेच निवडून येतील. राहुल नार्वेकर लढले तरी पडतील. राहुल नार्वेकर यांचे स्वतःचे मत चुकीच्या निर्णयामुळे खराब झाले असल्याचे खैरे म्हणाले आहेत. 


ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार...


काम करणारे कोण असतात, काम करणारे कार्यकर्ते शिवसैनिकच असतात. म्हणून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथून ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार असल्याचे खैरे म्हणाले. 


पक्ष कोणी फोडले लोकांना माहिती आहे...


सर्व जनतेला माहीत झालेले आहे की, शरद पवारांची घड्याळ काढून टाकले असून, दुसरे चिन्ह दिलेले आहे. ज्यांनी यांना मोठे केले, ज्यांनी पक्ष मोठा केला, ज्यांनी पक्ष निर्माण केला त्यांचा चिन्ह घड्याळ होते. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यांचाच पक्ष फोडला. लोकांना हे सर्व बघून शॉक बसतो. लोकांनी पूर्ण पाहून घेतलेले आहे. घड्याळीचे चिन्ह अध्यक्षांनी अजित पवार यांना दिलेले आहे. शरद पवारांना तुतारी दिलेली आहे. लोकांना माहित आहे शिवसेना कुणी फोडली, राष्ट्रवादी कुणी फोडली आणि आता काँग्रेस कोण फोडत आहे. त्यामुळे लोकांना सर्व गोष्टी माहित आहे आणि याचा परिणाम होणार नाही, असेही काही म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Lok Sabha Elections 2024 : लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी? फडणवीसांनी घेतली भेट, चर्चांना उधाण