पुणे : चांदणी चौकात कोट्यवधी (Chandani Chawk Flyover) रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधल्यानंतरही पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. महापालिकेने पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग निर्माण करणे, पादचारी पूल उभारला जाणार आहे. त्यासाठीचा खर्च किमान 25 कोटी रुपये असणार आहे. महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. मात्र नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उड्डाणपुलासोबत पादचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी अशी मागणी यापूर्वी देखील केली जात होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 


उड्डाणपुलाचे उद्‍घाटन झाल्यानंतर पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याची टीका करण्यात आल्याने एनएचएआय आणि महापालिकेचे डोळे उघडले. महापालिकेने यासाठी चांदणी चौकात अभ्यास करून समस्या आणि सुधारणा याचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेला पादचारी मार्ग बांधण्यासाठी सुमारे 15 कोटी तर एनएचएआयला पादचारी पूल बांधण्यासाठी सुमारे 10 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.


उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.


वाहतूक कोंडी जैसे थे....


चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटेल अशी अपेक्षा होती मात्र वाहतूक कोंडी जेसे थेच दिसत आहे. वाहतूक कोंडी होण्यामागची काही प्रमुख कारणं समोर आली आहे. चांदणी चौकातील पुलाची चुकलेली रचना, खडलेली कामे ,भुसारी कॉलनी ते मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम आत्ता सुरु करण्यात आलं, चांदणी चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आधी कुठलीही सोय करण्यात आली नव्हती, ही चुक लक्षात आल्यानंतर आता फुट ब्रिज बांधण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे.मुंबईकडून पुण्यातील पाषाण- बावधनकडे जाणाऱ्या रस्तावरची वाहने एकमेकांना क्रॉस होत असल्याने तिथे भिंत बांधून एक बाजू बंद करायचं एन एच ए आय ने ठरवलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-