एक्स्प्लोर

केंंद्रीय पथकाचा धावता दुष्काळ पाहणी दौरा

केंद्रीय पथकानं विदर्भ, मराठवाडा आणि पुणे विभागात दुष्काळाचा धावत्या पाहणीला सुरुवात केली आहे. धावता पाहणी दौरा यासाठी कारण हे पथक येतं आणि काही क्षणात निघूनही जातं, असंच काहीस चित्र आहे.

मुंबई : राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. उजाड माळरान, ओसाड जमीन, प्यायला आणि पिकाला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशा परिस्थिती शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आस आहे. केंद्राचं 10 सदस्यीय पथक दुष्काळ पाहणीसाठी राज्यात दाखल झालं आहे. या पथकानं विदर्भ, मराठवाडा आणि पुणे विभागात दुष्काळाचा धावत्या पाहणीला सुरुवात केली आहे. धावता पाहणी दौरा यासाठी कारण हे पथक येतं आणि काही क्षणात निघूनही जातं, असंच काहीस चित्र आहे.

सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील आंधळगावात रस्त्यावरील धुराळा उडवत केंद्राचं पथक पोहोचलं. रोडच्या कडेला असलेल्या सिताराम वेळापुरे यांच्या शेतात उभ्या उभ्या दोन मिनिटाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला . आपली तळमळ कळावी म्हणून दिल्लीच्या साहेबांशी मोडक्या तोडक्या हिंदी भाषेतून बोलूण शेतकरी दुष्काळाची दाहकता सांगण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी आलेल्या 85 वर्षीय अपंग आजोबांकडे मात्र पथकानं साफ दुर्लक्षच केलं.

परभणी परभणी जिल्ह्यातील गणेशपूर परिसरात पथकानं कापसाच्या पिकाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी दुष्काळी उपाययोजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड देऊ शकत नाही, तर काय दिलासा देणार असा जाब पथकानं अधिकाऱ्यांना विचारला. दरम्यान, पथकानं पेडगावचा नियोजित दौरा रद्द केल्यानं शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांमुळे पथकाला आपल्या गाड्या पेडगावला वळवणं भाग पडलं.

जळगाव जामनेर तालुक्यात केंद्रीय पाहणी पथकानं चक्क संध्याकाळच्या अंधारात बॅटरी लावून परिस्थितीची पाहणी केली. आता बॅटरीच्या उजेडात त्यांना किती दुष्काळ दिसला हा प्रश्नच आहे. पण, पथकानं पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं मान्य केलं. त्यामुळे आता केंद्राकडून किती मदत मिळते याकडं शेतकरी आस लावून बसला आहे.

जालना जालना जिल्ह्यात सकाळी 11 वाजता नियोजित पाहणी दौरा होता. मात्र तो सुरु व्हायला दुपारचा एक वाजला होता. बदनापूर तालुक्यातील पाहणी करताना पथकानं दोन गावांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या.

सांगली दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकानं आटपाडी तालुक्यातील गावांमध्ये पाहणी केली. या पथकासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं पथकासमोर मांडलं. या पाहणीनंतर सरकार काही मदत आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहाणी करणं केंद्रीय पथकाला अशक्य आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये दुष्काळाचं वास्तव मांडलं जावं एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. इतकीच अपेक्षा आहे.

राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
Sharad Pawar : डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget