Ramdas Athavale On Constitution: आगामी लोकसभा निवडणुकांच्या(Lok Sabha Election 2024)पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) 'अबकी बार चारसो पार'चा नारा दिल असून त्या अनुषंगाने देशभरात भाजपचे सर्व नेते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहे. तर, दुसरीकडे या व्यक्तव्यावरुन राज्यात चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. अशातच भाजप सत्तेत आल्यास ते देशाचे संविधान बदलतील, असा आरोपही विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असताना यावर सत्तेत असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी आक्रमक पवित्र घेत थेट इशारा दिला आहे.


मोदी सरकारचे चारशे पारचे उद्दिष्ट सत्यात आले तर ते संविधान बदलतील, असा प्रचार सध्या विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र आता  विरोधकांना कुठलाही मुळ मुद्दा नसल्याने ते अशा पद्धतीचा बोगस आणि अपप्रचार करत आहेत. संविधान बदलण्याची भाषा कुणीही करू नये. जर उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी सर्वप्रथम माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे थेट इशारा रामदास आठवले यांनी दिलाय. ते आज ते आज गोंदिया येथे आले असता त्यावेळी ते बोलत होते.   


नाना पटोलेंच्या टीकेला खास कवितेतून उत्तर


 भाजपने आपल्या प्रचारासाठी गुंडे आणले असल्याचे असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कवितांमधून उत्तर दिले आहे. 'आम्ही अजिबात आणत नाही प्रचारात गुंडे, पण काँग्रेसचे येणार आहेत अनेक पैशाचे हंडे', असे म्हणत आम्ही अजिबात गुंडशाहीच्या उपयोग करत नसल्याचे आठवले पुढे म्हणाले. 


.... म्हणून शिर्डीच्या जागेवर माघार 


शिर्डीच्या जागेवरून रामदास आठवले हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, तेथील काही स्थानिक नेत्यांचा मला विरोध होता. मी बळजबरीने उमेदवारी घेऊ शकलो असतो. मात्र मागच्या वेळी जशी माझी शिकार झाली होती, तशीच शिकार यावेळी झाली असती. त्यामुळे मी माघार घेतली असल्याची स्पष्टोक्ती रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.


तर काँग्रेसने महाविकास आघाडी मधून बाहेर पडावं


राज्याचे मंत्री आणि चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील सभेदरम्यान काँग्रेसवर टीका केली होती. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारले असता, ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांना कुठेही असभ्य भाषेत टीका केली नाही. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे ते म्हणाले.


सोबतच, सांगली लोकसभेच्या उमेदवारावरुन महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रश्न केले असता, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसवर अन्याय केलाय. काँग्रेसने याबाबत  विचार करावा असे वक्तव्य आठवले यांनी केलंय. एवढेच नाही तर काँग्रेसने महाविकास आघाडी मधून बाहेर पडावं, असेही आठवले म्हणाले. ते आज गोंदियात आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केलंय. 


इतर महत्वाच्या बातम्या