Ramdas Athavale On Constitution : काँग्रेस पक्ष आज धोक्यात आला असताना ते लोकशाही धोक्यात असल्याचा बनाव रचत आहे. मात्र लोकशाही कधीही धोक्यात येऊ शकत नाही. या लोकशाहीच्याच जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) दोनदा देशाचे पंतप्रधान झाले. आम्ही लोकशाही मानणारे लोक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आम्ही सर्वोच्च स्थानी मानतो. त्यामुळे आम्ही या देशाच्या राज्यघटनेला कुणालाही हात लावू देणार नाही. कोण म्हणतं या देशाची घटना बदलली जाणार आहे. त्यात अजिबात तथ्य नसून अतिशय चुकीचा प्रचार करून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सध्या विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी विरोधकांवर केला. आज नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कन्हान येथे होत असलेल्या पंतप्रधानाच्या जाहीर सभास्थळी ते बोलत होते.


देशाच्या संविधानाला हात लावू देणार नाही 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माझा सवाल आहे. एकीकडे तुम्ही भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशाला जोडण्याची भाषा करत आहात. मात्र, दुसरीकडे समाजाला तोडण्याची भूमिका तुम्ही मांडत आहात. हे अतिशय चुकुचे आहे. आज काँग्रेस एक प्रकारे बदनाम झालेला पक्ष आहे. असे म्हणत खास कवितांच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. पुढे आठवले म्हणाले की, काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला तुम्ही करून टाका नष्ट , भारत देशासाठी नरेंद्र मोदी करत आहेत देशात फार मोठे कष्ट, मग इंडिया आघाडी का नाही होणार नष्ट. अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये कवितांच्या माध्यामातून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. 


नितीन गडकारींमुळे देशात उच्च दर्जाच्या रस्त्यांचे जाळे 


विदर्भात होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला प्रत्येक नागरिकांनी आपल्या निवडणुकीचा अधिकार बजावायचा आहे. केंद्रीय मंत्री आणि आमचे नेते नितीन गडकरी हे देशाचे मोठे नेते आहेत. देशभरात त्यांनी आपल्या विकास कामातून रस्त्यांचे जाळे पसरवले आहे. काँग्रेसच्या काळात सर्व राष्ट्रीय महामार्ग सिंगल लाईन मध्ये होते. आज देशभरातील सर्वे रस्ते चकाचक झाले आहेत. देशात अनेक विमानतळांचा विकास झाला असून त्यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. याच कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतले असून जम्मू काश्मीर मधनं 370 कलम या सरकारने हटवली आहे.


आज तेथील आतंकवाद जवळजवळ संपला आहे. देशात झालेल्या विकासकांच्या जोरावर आज आम्ही आपल्यापुढे मत मागण्यासाठी आलो असल्याचेही रामदास आठवले म्हणाले. या विकासकामांमुळे देशभरात महायुतीची प्रचंड मोठी ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी दिलेला चारसो पारचा नारा हा सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला फार अवघड जाणार नाही, असा विश्वासही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना व्यक्त केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या