पुणे मावळ लोकसभा मतदारसंघात रोज नव्या नव्या हालचाली (Maval Loksabha Constituency) होताना दिसत आहे. त्यात महायुतीकडून श्रीरंग बारणे (Shrirang barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून उबाठाच्या संज्योग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे. प्रचारादरम्यान मतदार संघात रंगत बघायला मिळते आहे. त्यातच आता  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना 'उबाठा'ला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 


काळेवाडी येथे झालेल्या शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीच्या मेळाव्यात हा शिवसेना पक्षप्रवेश झाला. खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. 'उबाठा' गटाचे मावळ उपतालुकाप्रमुख आणि माजी सरपंच चंद्रकांत भोते, ओव्हळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, उबाठा शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी येथील संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. 


मावळमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे. त्यात संज्योग वाघेरे (शिवसेना, ठाकरे गट) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदे गट) अशी लढत होणार आहे. दोन्ही नेत्यांकडून प्रचारासाठी आणि जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. रोज वेगवेगळ्या सभा घेतल्या जात आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यासोबतच एकमेकांवर ताशेरे ओढळे जात आहेत. त्यातच आता अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गाटत खिंडार पडल्याचं दिसत आहे
 
ठाकरे गटाकडून संज्योग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी विविध धोरणं आखली जात आहे. त्यात पक्षाचे नेते संज्योग वाघेरेंच्या प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण एके धनुष्यबाण'च चालवावे, अशा स्पष्ट सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Pune News : चि. मतदार, चि.सौ.का. लोकशाही;   पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना मतदानाचे आवाहन


Murlidhar Mohol : तरुणांसाठी रिल्स तर जेष्ठांसाठी घरोघरी दौरे; मुरलीधर मोहोळांचा दणक्यात प्रचार सुरु