मुंबई बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी (Badlapur School Abuse Case)  एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.   या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अनेक  खुलासे केला आहे. बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटिव्हीचे मागील 15  दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहे. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब  शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून  आल्याची माहिती देखील  मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच 'शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही, असे देखील दिपक केसरकर म्हणाले.

  


दिपक केसरकर म्हणाले, प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही लावणे हे आवश्यक आहे.  तसेच त्याचे 15 दिवसाचे रेकॉर्डिंगही गायब आहे. त्याची  चौकशी करत आहोत.  शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहे.  शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर  आली आहे. 15 दिवसांचे सीसीटीव्ही आढळलेले नाही, असे अहवालात म्हटले आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार  असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. 


पीडित मुलीच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो: दीपक केसरकर


सध्या आम्ही फक्त वस्तूस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10  लाखाची मदत केली जाईल आणि जिच्यावर अत्याचाराचा  प्रयत्न झालेला आहे तिला तीन लाख मदत करणार आहे. दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात  देण्यात येणार आहे.  मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ दोन्ही मुलींना आम्ही मदत करू असेही दीपक केसरकर  म्हणाले.  


कामिनी कायकर, निर्मला बुरे यांच्यावर मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी: केसरकर


 बदलापूर येथील शाळेत   घडलेल्या प्रकारासंदर्भात समिती नेमण्यात आली होती. या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार  आम्ही आज यावर निर्णय घेतला आहे.  मुलींना शौचालयात घेऊन जाण्यासाठी  कामिनी गायकर, निर्मला भुरे  दोन सेविका होत्या. त्यांची   ड्युटी होती लहान मुलांना शौचास नेणे या दोघी चौकशीला उपस्थित नव्हत्या.  त्यांना काही बोलायचं नाही असे गृहीत धरून आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवले.   या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावं असं आम्ही सांगितले आहे.