जळगाव : बालपणी वडील गमावले, त्यानंतर कोरोनात (Corona) आजी-आजोबा गमावलेल्या वरणगाव (Varangaon) येथील अंकित जावळे (Ankit Jawle) या तरुणाची आई नीलिमा जावळे (Nilima Jawle) यांचा देखील नेपाळ बस दुर्घटनेत (Nepal Bus Accident) मृत्यू झाल्याने अंकित जावळे हा तरुण घरात आता एकटा पडला आहे.
नुकतीच नेपाळमधे बस नदीमध्ये कोसळून त्यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील पंचवीस जणांचा मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यामध्ये वरणगाव येथील अंकित जावळे या तरुणाच्या आईचा देखील समावेश होता. वरणगाव येथील जावळे वाड्यातील एकूण आठ जण या अपघातात मरण पावले आहेत.
वरणगाव 80 जण गेले होते नेपाळला
अयोध्या दर्शन घेण्याबरोबर नेपाळमधील पशूपती नाथांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी वरणगाव येथील जवळपास 80 जण दोन बसच्या माध्यमातून नेपाळकडे निघाले होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिर दर्शन झाल्यानंतर नेपाळमध्ये जात असताना काठमांडू जिल्ह्यात पोखरा पॉइंटवरून बस जात होती. एक बस सुरळीतरित्या पुढे निघाली, मात्र दुसरी बस चालकाचे नियत्रंण सुटून नदीत कोसळली. यामुळे बसमधील 27 जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत गेलेल्या अंकित जावळे यांच्या मातोश्री नीलिमा जावळे यांचाही समावेश होता.
नेपाळ बस अपघातात आईचा मृत्यू
अंकित जावळे हा लहान असतानाच आजारपणामुळे त्याचे पितृछत्र हरपले होते. आजी आजोबा आणि आई नीलिमा जावळे यांच्यासोबत राहत असताना कोरोना काळात त्याने आपल्या आजी आजोबांना ही गमावले. या धक्क्यातून सावरत नाही तो त्याचा एकमेव आधार असलेल्या आईचाही आता नेपाळ बस अपघातात मृत्यू झाला आहे. अंकित जावळे हा घरात एकटाच पडला आहे. आता एकट्याने जगायचे कसे? असा प्रश्न त्याच्या पुढे पडला आहे.
देवाने दुःख पचविण्याची शक्ती द्यावी
अंकित जावळे हा तरुण त्याच्या आईसोबत शेतीकाम करून आपला उदरनिर्वाह करत असे. आईची मदत असल्यानं शेती करणे शक्य होत होते. आता मात्र घरातील आधार तर गेलाच शिवाय उदरनिर्वाहाचाही आधार गेल्याने अंकित पुढे मोठे संकट आले आहे. नेपाळ बस अपघातात अंकितने आपली आई गमावली. तसे आपल्या जवळचे सहा नातेवाईक देखील गमावले असल्याने अंकित जावळे हा या अपघाताने सुन्न झाला आहे. देवानेही दुःख पचविण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आता तो करत आहे.
आणखी वाचा