एक्स्प्लोर

नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार सील

नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार सीबीआयने सील केल्या आहेत.

रायगड : पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरुच आहे. नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील किहीम येथील आलिशान बंगला आणि दोन कार सीबीआयने सील केल्या आहेत. नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनाऱ्यालगत सुमारे 70 गुंठे जागेमध्ये आलिशान बंगला आहे. नीरव मोदीच्या या बंगल्यामध्ये 13 कर्मचारी काम करत होते. मंगळवारी दुपारी नीरव मोदीच्या बंगल्यावर मुंबईच्या सीबीआय पथकाने धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कारवाईनंतर नीरव मोदी याचा आलिशान बंगला सील करण्यात आला. या बंगल्यात असलेल्या दोन कारही सील करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सीबीआय अधिकारी आणि पोलिसांनी मात्र माध्यमांशी बोलणं टाळलं. तर, सील केलेल्या या बंगल्याची किंमत ही सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नीरव मोदी कोण आहे? नीरव मोदी भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे, ज्याला भारतातील 'डायमंड किंग' असंही म्हटलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. नीरव मोदीची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्याने आपल्याच नावाने म्हणजे नीरव मोदी डायमंड ब्रँड नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदीचे 25 लग्झरी स्टोअर आहेत. नीरव मोदीच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदीच्या डायमंड ब्रँडची ब्रँड अम्बेसिडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदीच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदीचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदीने सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले...
देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले...
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget