एक्स्प्लोर

CBI Investigation in SSR Death Case: सीबीआयची टीम कुठल्याही क्षणी मुंबईत दाखल होणार, यांनाही क्वारंन्टाईन करणार का? किरीट सोमय्यांचा सवाल

Supreme Court Verdict on SSR Death Case: सीबीआयचा तपास हा बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असणार आहे. मागच्या वेळी तपासासाठी आलेले बिहार पोलिस टीमचे अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीनं क्वॉरंन्टाईन केलं होतं.

नवी दिल्ली : सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयची टीम दिल्लीतून कुठल्याही क्षणी मुंबईत दाखल होऊ शकते. या प्रकरणात सीबीआयनं आधीच स्थापन केलेली स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. यात सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर मनोज शशीधर, आयपीएस गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अॅडशिनल एसपी अनिल यादव यांचा समावेश आहे.

या टीमपैकी काही सदस्य तातडीनं मुंबईत दाखल होऊन या प्रकरणातली कागदपत्रं ताब्यात घेतील. या प्रकरणातली केस डायरी, क्राईम सीनवरचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट आणि आत्तापर्यंत घेतलेल्या जबानींची प्रत या सगळ्या गोष्टी मुंबई पोलिसांना या टीमला सादर कराव्या लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या तपासासाठी सीबीआयची ही टीम दिल्लीतून मुंबईत येते आहे.

सीबीआयचा तपास हा बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असणार आहे. मागच्या वेळी तपासासाठी आलेले बिहार पोलिस टीमचे अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीनं क्वॉरंन्टाईन केलं होतं. आता मात्र सीबीआयची ही टीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दाखल होतेय, शिवाय तपासात महाराष्ट्र सरकारनं पूर्ण सहकार्य करावं असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे आता या टीमला महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असेल.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावरुन बीएमसी आणि पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहून चिमटा काढला आहे. आता सीबीआयची जी टीम मुंबईत तपासासाठी येऊ शकते, त्यांनाही क्वॉरंन्टाईन करणार का हा प्रश्न त्यांनी पत्रात विचारला आहे.

SSR Case SC Verdict | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, सुप्रीम कोर्टाचा निकाल 

सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतं.

संबंधित बातम्या

CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget