एक्स्प्लोर

Sachin Vaze Case : सीबीआयने केली परमबीर सिंह,सचिन वाझे आणि संजय पाटील यांची चौकशी

परमबीर सिंह यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सचिन वाझेंना शंभर कोटीचा वसुलीसाठी गृहमंत्र्यांनी सांगितला होता. ज्यामुळे सचिन वाझेंची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली.

 मुंबई : मुंबईचे माझे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या सीबीआयने आज परमबीर सिंह, याचिकाकर्ता जयश्री पाटील, सचिन वाझे आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे जबाब नोंदवले आहे. तर लवकरच बड्या नेत्यांची ही चौकशी सीबीआयकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी पोलीस दलाला शंभर कोटीच्या वसुलीचा टारगेट दिल्याचा दावा केला होता. ज्यानंतर परमबीर सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ज्या नंतर उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

6 एप्रिलला सीबीआयचे चार अधिकारी मुंबईत पोहोचले, त्यांनी सर्व कागदपत्र तयार करून तपासाची दिशा ठरवली ज्या नंतर 7 तारखेला याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. 100 कोटींच्या वसूली संदर्भात न्यायालयामध्ये तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या पैकी परमबीर सिंह आणि घनश्याम उपाध्याय या दोघांची याचिका फेटाळून न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर तपास करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. ज्यामुळे जयश्री पाटील यांचा जबाब सीबीआयने नोंदवला.

परमबीर सिंह यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सचिन वाझेंना शंभर कोटीचा वसुलीसाठी गृहमंत्र्यांनी सांगितला होता. ज्यामुळे सचिन वाझेंची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. तसेच एन्फॉर्समेंटचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना सुद्धा गृहमंत्र्यांनी बंगल्यावर बोलून शंभर कोटींच्या वसुली संदर्भात सांगितले होते असा दावा परमबीर सिंह यांनी आपल्या आरोपांमध्ये केला होता.

परमबीर सिंह, जयश्री पाटील, आणि संजय पाटील यांची चौकशी सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली. तर सचिन वाझेंची चौकशी NIA कार्यालया मध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सीबीआयच्या तपासाची दिशा कशी असणार आहे तसेच सीबीआयच्या रडारवर अजून कोन व्यक्ती येत आहे ते पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
Sharad Pawar : डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Embed widget