एक्स्प्लोर
38 लाखांच्या हजाराच्या नोटांसोबत खेळण्यातल्या नोटा जप्त

अहमदनगर : अहमदनगर शहरात तब्बल 38 लाख 50 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या सर्व नोटा चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या आहेत. राहुल भंडारी नावाच्या व्यक्तीकडून पोलिसांनी दोन बॅग जप्त केल्या आहेत. हिरव्या रंगाच्या बॅगेत 38 लाख रुपये किमतीच्या खऱ्या नोटा होत्या. तर लाल रंगाच्या बॅगेत लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा होत्या. या दोन्ही बॅग पोलिसांनी जप्त केल्या आहेत. रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी राहुल भंडारीची चौकशी केली. राहुलनं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं पोलिसांनी त्याला दोन्ही बॅगांसह ताब्यात घेतलं. खऱ्या नोटांसोबत खेळण्यातल्या नोटा बाळगण्याचा काय उद्देश होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















