एक्स्प्लोर
Advertisement
विश्रामगृह कर्मचाऱ्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा
नाशिक : विश्रामगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार आणि त्यांच्या एका कार्यकर्त्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका खाजगी कार्यक्रमानिमित्त शेलार यांच्याकडे वर्ध्याचे खासदार रामदास तडस हे काल नाशिकला आले होते. त्यांच्या निवासाची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती. मात्र खासदार तडस यांना देण्यात आलेली रुम बदलण्यावरुन वाद निर्माण झाला.
खासदार तडस यांना रुम बदलून VVIP सूट देण्यात यावा म्हणून विश्रामगृहातील व्यवस्थापक, कर्मचारी आणि कक्षसेवक यांच्याशी शेलार आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यक्रत्याने वाद घातला. VVIP सूट हा फक्त मुख्यमंत्री, राज्यपाल अशा महत्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असतो, असं कक्षसेवकाने सांगताच त्याला विश्रामगृहातच मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
याप्रकरणी कक्षसेवकाच्या तक्रारीनुसार मुंबईनाका पोलीस स्टेशनला गजानन शेलार आणि एका कार्यकर्त्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
फॅक्ट चेक
शेत-शिवार
पुणे
महाराष्ट्र
Advertisement