एक्स्प्लोर
आमदार बबनराव शिंदेंसह माजी खा. संदिपान थोरात यांच्यावर गुन्हा
संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

पंढरपूर : माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. या तिघांवर माढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज रात्री उशिरा माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यार भा.दं.वी. कलम 409, 420, 464, 465 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















