एक्स्प्लोर

टोलनाक्यावर राडा, मनसे आमदार शरद सोनवणेंवर गुन्हा

जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. चाळकवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने आळे फाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

पिंपरी चिंचवड : रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोलवसुली सुरु असल्याने मनसेने पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाका बंद पाडला. त्यामुळे जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. चाळकवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने आळे फाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. सोनवणे आणि दीडशे कार्यकर्त्यांनी काल टोल नाका बंद केला होता. जमावबंदी झुगारून केलेल्या आंदोलनामुळे मुंबई कायद्यानुसार आणि कलम 143 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्याचे अपूर्ण काम असताना टोल आकारला जात असल्याने टोल बंद करण्यात आला होता. साडे सहा वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातून गेल्या वर्षी या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. या रस्त्यावर यापूर्वी झालेल्या एका अपघातात एकाच वेळी नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 15 जण जखमी झाले होते. पुणे-नाशिक हा 210 किलोमीटरच्या मार्गावरील हा पहिलाच अपघात नाही. याआधी अनेक अपघात झाले, ज्यात शेकडो प्रवाशांचे जीव गेले. त्यामुळे या मार्गाचं चौपदरीकरण करण्याची मागणी होत होती. त्यालाच अनुसरून या मार्गाचं साडे सहा वर्षांपासून काम सुरु आहे. बऱ्याच अंशी या मार्गाचं काम पूर्ण झालंय, मात्र अद्यापही काही गावांत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही, तर काही ठिकाणी एक पदरी मार्ग आहे. या सर्व परिस्थितीत वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तो वेगळाच, मात्र टोलवसुलीही केली जात आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक होत काल टोलवसुली बंद पाडली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Sachin Ahir: मी आदित्य ठाकरेंना नेहमी सांगायचो, आपली मतं शिंदेंकडे चाललेत, आपण फिरलं पाहिजे: सचिन अहिर
मी आदित्य ठाकरेंना नेहमी सांगायचो, आपली मतं शिंदेंकडे चाललेत, आपण फिरलं पाहिजे: सचिन अहिर
Sunil Shinde and Sahin Ahir: तुमच्याआधी सुनील शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार होते का? प्रश्न ऐकताच सचिन अहिर सावधपणे म्हणाले...
तुमच्याआधी सुनील शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार होते का? प्रश्न ऐकताच सचिन अहिर सावधपणे म्हणाले...
Mumbai: एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकरांच्या पॅनेलचा दारुण पराभव
मुंबईतील एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Embed widget