एक्स्प्लोर
नागपुरात सेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीने 7 जणांना चिरडले!
नागपूर : नागपुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या मारुती 800 कारने 7 जणांना चिरडले. या घटनेत 6 महिन्यांची चिमुकली आणि 60 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर 3 महिला आणि 2 पुरुष जखमी आहेत.
आसिया ताज मोहम्मद (वय 6 महिने) आणि इस्लाम बी शेख (वय 60 वर्ष ) यांचा मृत्यू झाला आहे.
प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेकडून सुरेखा बंडू तळवेकर या उभ्या आहेत. त्या शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि पक्षाचे नागपुरातील महत्वाचे नेते बंडू तळवेकर यांच्या पत्नी आहेत.
आज संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्ते वनदेवी नगरात प्रचार करत होते. एका वळणावर प्रचारात वापरली जाणारी मारुती 800 कार अनियंत्रित झाली आणि थेट शेजारच्या झोपडीत शिरली. झोपडीत बसलेले कुटुंब त्या कारखाली चिरडले.
या घटनेनंतर लोकांनी कारमधील शिवसेना कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून गेले. मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमले आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की, शिवसेनेचे काही कार्यकर्ते प्रचारावेळी दारू पिऊन होते आणि त्यामुळेच त्यांना कार नियंत्रित करता आली नाही आणि अशी दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान, घटनेनंतर शिवसेना नेत्यांनी मौन बाळगले असून, नगरसेवक बंडू तळवेकरही आऊट ऑफ रिच आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement