रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील कशेळीच्या समुद्रकिनारी कॅप्सुल आकाराची रबरा सारखी वाटणारी वस्तू वाहत आली आहे. गेले काही दिवसांपासून ही वस्तू खोल समुद्रामध्ये ग्रामस्थांना दिसत होती. ती आत्ता किनाऱ्याला लागली आहे.
पण संबंधित वस्तूपर्यंत पोहचणे जिकरीचे बनले होतं. आता ही कॅप्सूलच्या आकाराची वस्तू कशेळीच्या किनारी लागली आहे. पण ही पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
वारंवार याबाबतची माहिती देऊनही, पोलिसांनी संबंधित वस्तूंची पाहणी करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, शासकीय यंत्रणांनी किनाऱ्यावर जाऊन ती वस्तू नेमकी काय आहे? या बाबत कोणतीच शहानिशा न केल्याने. किनारा सुरक्षिततेबाबत जागरूक असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजापूर तालुक्यात कशेळी समुद्रात कॅप्सुल सदृश्य वस्तू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2017 11:48 PM (IST)
राजापूर तालुक्यातील कशेळीच्या समुद्रकिनारी कॅप्सुल आकाराची रबरा सारखी वाटणारी वस्तू वाहत आली आहे. गेले काही दिवसांपासून ही वस्तू खोल समुद्रामध्ये ग्रामस्थांना दिसत होती. ती आत्ता किनाऱ्याला लागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -