एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/08/2017
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2017 06:47 PM (IST)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/08/2017 1. मुख्यमंत्री आणि महापौरांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार, ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर मुंबईकरांचे हाल https://goo.gl/fHiHxE 2. मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची राज्यभर रंगीत तालीम, मुंबईतल्या शिवाजी मंदिर सभागृहात स्पेशल टास्क रूम https://goo.gl/hY58L7 3. पुण्यातील बालेवाडीत 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा पारितोषिक सोहळा, दुष्काळाला हरवून गाव पाणीदार करणाऱ्या गावकऱ्यांचा सन्मान https://goo.gl/D5nb7Q 4. सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, कर्जबाजारीपणाला वैतागलेल्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://goo.gl/acjKtr 5. अंबाबाई मंदिरात महिलांचा गोंधळ, पुजाऱ्याला बाहेर काढलं, पुजारी हटाव आंदोलन आणखी तीव्र https://goo.gl/JN6Q4V 6. अहमदनगरमध्ये पोलीस ठाण्यासमोरच गोरक्षकांवर हल्ला, 8 जण गंभीर जखमी, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर https://goo.gl/3cgeUM 7. सरकारी कर्मचाऱ्यांना दशवार्षिक वेतन आयोगाऐवजी दरवर्षी पगारवाढ देण्याच्या हालचाली, अर्थव्यवस्थेवर एकदम पडणारा बोजा कमी करण्याचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in 8. आता नोकरीच्या एका वर्षानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी मिळण्याची शक्यता, निर्धारित कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन https://goo.gl/NP5mbU 9. रक्षाबंधनासाठी बहिणीला 'टॉयलेट' गिफ्ट, उत्तर प्रदेशातील भावाकडून अनोखी भेट https://goo.gl/wtGi2e 10. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याप्रकरणी 3 दहशतवाद्यांना अटक, जम्मू-काश्मीर पोलिसांचं मोठं यश https://goo.gl/hHDpGu 11. फ्रेण्डशीप डे निमित्ताने सोशल मीडियावर मेसेजेसचा पाऊस, युवांचं जोरदार सेलिब्रेशन, मॉल, कॅफे, आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी http://abpmajha.abplive.in 12. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा, लीलावती रुग्णालयाची माहिती https://goo.gl/JSVHgj 13. वेगाचा बादशाह युसेन बोल्टच्या झळाळत्या कारकीर्दीचा अँटी क्लायमॅक्स, 9 वर्षांच्या विक्रमादित्याला शेवटच्या शर्यतीत कांस्य https://goo.gl/NFZ2Mp 14. टीम इंडियाची कोलंबो कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी, भारताचा एक डाव आणि 53 धावांनी विजय https://goo.gl/tvK7HW 15. कोलंबो कसोटीचा सामनावीर पुढच्या कसोटीतून 'आऊट', अखिलाडीवृत्तीसाठी रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई https://goo.gl/FPwPo7 माझा कट्टा : भारत विकास ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांच्याशी गप्पा, आज रात्री 8 वाजता फक्त एबीपी माझावर 'माझा'च्या आर्काईव्हजमधून, जलपुरुष, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर दिला मदतीचा हात, विशेष कार्यक्रम, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर