एक्स्प्लोर

अवैध बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद नाही : निवडणूक आयोग

‘बेकायदा होर्डिंग-बॅनरबाजीमुळे शहरांच्या होणाऱ्या विद्रुपीकरणाच्या प्रश्नात निवडणूक आयोगानेही आता लक्ष घालणे आवश्यक असून, त्याप्रमाणे योग्य त्या कारवाईचा विचार करावा’, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.

मुंबई : राजकीय नेते व त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंग व बॅनरबाजीबद्दल त्यांच्या पक्षावर कडक कारवाई किंवा त्या पक्षाची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवलीय. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीत कायद्यांतील तरतुदीप्रमाणे या मुद्यावरून पक्षांची नोंदणी रद्द करण्याची कठोर कारवाई करता येऊ शकणार नाही, असे म्हणत निवडणूक आयोगाने आपले हात झटकलेत. ‘बेकायदा होर्डिंग-बॅनरबाजीमुळे शहरांच्या होणाऱ्या विद्रुपीकरणाच्या प्रश्नात निवडणूक आयोगानेही आता लक्ष घालणे आवश्यक असून, त्याप्रमाणे योग्य त्या कारवाईचा विचार करावा’, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. सुस्वराज्य फाऊंडेशनने यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आदेश देताना बेकायदा होर्डिंग व बॅनरबाजीला चाप लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील स्थानिक प्रशासनांना वेळोवेळी दिले आहेत. शुक्रवारच्या सुनावणीत नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, इत्यादी महानगरपालिकांनी केलेल्या कारवाईविषयी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानंतर ज्या महापालिकांनी अद्याप प्रतिज्ञापत्र दिलेले नाही, त्यांनी २९ सप्टेंबरपर्यंत द्यावे, असे निर्देश न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनाक यांच्या खंडपीठाने दिले. निवडणूक आयोगाच्या आजपर्यंतच्या इतिहासात या प्रश्नावरून कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आलेली नाही. राजकीय पक्षांकडून नोंदणी होताना संबंधित कायद्यांचे पालन करण्याची हमी दिली जात असली तरी ती नंतर पाळली जात नाही. परंतु, त्यावर सातत्याने देखरेख ठेवणे आयोगाला शक्य नाही. शिवाय मालमत्ता विद्रुपीकरण कायदा व लोकप्रतिनिधित्व कायदा यामध्ये अशा बेकायदा होर्डिंगबाजीबद्दल राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याइतपत कठोर तरतुदी नाहीत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी कायदे कठोर केल्याशिवाय अशी कठोर कारवाई करणे शक्य होणार नाही’, असे म्हणणे आयोगातर्फे हायकोर्टात आपली भुमिका स्पष्ट करण्यात आलीय. शिर्डी शहरात एकही बेकायदा होर्डिंग लागत नसल्याने कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही, असे म्हणणे राज्य सरकारने पूर्वी मांडले होते. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत न्यायालयाने शिर्डी नगरपालिकेचे प्रतिज्ञापत्र मागितले होते. त्याप्रमाणे नगरपालिकेने शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल करत शहरातही बेकायदा होर्डिंग असून त्यावर कारवाईही केली जात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ‘सरकारने कोणत्या आधारावर शिर्डीला बेकायदेशीर होर्डिंगमुक्त आदर्श शहर ठरवले होते?’ असा सवाल करत त्याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget