एक्स्प्लोर

काँग्रेसची फरफट होऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते गरजेचे : अशोक चव्हाण

एकीकडे स्वतःच्या पक्षाला अशोक चव्हाणांनी सूचनावजा सल्ला दिला. तर तिकडे शिवसेनेला देखील सूचक इशारा देखील दिला आहे. संविधानाच्या मूल्यावर आधारीत कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात एकसूत्री कार्यक्रमाची चौकट मोडली तर निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळे आहोत असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होऊ नये यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ, अनुभवी आणि नव्या दमाच्या नेत्यांचं कॉम्बिनेशन मंत्रिमंडळात असलं पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. अशोक चव्हाण आज 'एबीपी माझा'च्या 'ऐसपैस गप्पा' या कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही खातेवाटपाचा निर्णय का होत नाही? आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दोन्ही चव्हाणांचं नेमकं काय होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 12 कॅबिनेट मंत्रिपदं आली आहेत. त्यात कुणाची वर्णी लागणार याचा सस्पेन्स अजून कायम आहे. अशावेळी अशोक चव्हाणांनी या सरकारमध्ये पक्षाची फरफट होऊ नये यासाठी प्रशासनाचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागणं गरजेचं असल्याचं देखील सुचवल आहे. एकीकडे स्वतःच्या पक्षाला अशोक चव्हाणांनी सूचनावजा सल्ला दिला. तर तिकडे शिवसेनेला देखील सूचक इशारा देखील दिला आहे. संविधानाच्या मूल्यावर आधारीत कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात एकसूत्री कार्यक्रमाची चौकट मोडली तर निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळे आहोत असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच सरकार आलं, पण खातेवाटपाला विलंब का? या प्रश्नाचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, खातेवाटपाविषयी कोणताच वादाचा विषय नाही. तिन्ही पक्षांना काम करण्याची संधी हवी. तिन्ही पक्षांची हीच इच्छा आहे. जनतेसाठी जास्तीत जास्त काम करता यावं, असे खाते आपल्याला मिळावं अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. काही महत्त्वाच्या खात्यावर चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असताना कोणतेही काम थांबलेल नाही. कॅबीनेटच्या बैठका सुरू आहेत. पाच वर्षे सरकार टिकवण्यासाठी एकवाक्यता येण गरजेचे आहे. कर्नाटक, गोवा राज्यात जे काही घडलं ते पाहता यापुढे भाजप काय करु शकतं हे गृहीत धरून आम्ही आमचं नियोजन केले आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार चालण महत्त्वाच आहे. आमच सरकार हे संविधानाच्या चौकटीत राहून काम करेल अस अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायच असेल तर त्यांच्याविषयी पक्षाला विचार करावा लागेल. त्यांच्याविषयीचा पूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. अजित पवारांच्या पक्षांतरावर बोलताना चव्हाण म्हणाले, अजित पवारांची काळजी त्यांच्याच पक्षांनी घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget