Lata Mangeshkar passes away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या. गायनाच्या माध्यमातून त्यांनी देशाला जगभरात सन्मान मिळवून दिला असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांच्या निधनाने आघात झाला असल्याचे गडकरी म्हणाले.

Continues below advertisement


लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. जगात त्यांनी देशाला सन्माम मिळवून दिला होता. त्यांचे संगीत, त्यांनी गायलेली गाणी पिढ्यान पिढ्याला प्रेरणा देतील असे गडकरी म्हणाले. लता मंगेशकर हे जगातील सातवे आश्चर्य आहे असे म्हटले जात होते. त्यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे कौटुंबीक संबंध होते. त्यांच्या जाण्यानं आमचा आधार गेला असल्याचे गडकरी म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासाशी त्यांचा जीवंत सबंध होता. त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची ईश्वर ताकद देवो असे गडकरी म्हणाले.


 







सात दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनावर विविध क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी 'युग संपले' असे ट्वीट केले आहे.   
 
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवाराली लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले.


महत्त्वाच्या बातम्या: