बैलगाडा शर्यती प्रकरणी सुप्रीम कोर्टात सरकार, याचिकेवर सोमवारी सुनावणी
बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवरील असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या याचिका ऐकायची विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलीय. मुंबई उच्च न्यायालयाने 2017 साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली. ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या.
घोडा आणि बैल यांच्यावर होत असलेले अत्याचार थांबावे म्हणून घोडा बैल एकाच गाडीस जुंपण्यास बंधी घातली होती. . शर्यतींमध्ये बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणे, शेपूट चावणे, असे अनेक प्रकार करून अत्याचार केले जातात. म्हणून बंदी घालण्याची प्राणी मित्र करत आहेत.
संबंधित बातम्या :
हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम दहशतवादी संघटनांशी; सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरुन वाद
Nitin Gadkari : देशातील श्रीमंतांच्या यादीत कोल्हापूरकर अव्वल कसे? नितीन गडकरींनी कारण सांगितलं!
Fadnavis vs Nawab Malik आरोपांचा वाद कोर्टात; अमृताही मैदानात, मलिकांना कोर्टात खेचण्याची तयारी
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या






















