बुलढाणा : महाराष्ट्र सरकारचे असे अनेक प्रकल्प आहेत, ज्यांची राज्यभरात चर्चा झालेली आहे. अशा अनेक कामांपैकी एक काम म्हणजे समृद्धी महामार्गाची निर्मिती. या महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करण्यात आले. मात्र याच माहामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठे अपघात होत आहेत. या अपघातांमुळेदेखील समृद्धी महामार्ग गेल्या काही दिवासांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावर अपघातामुळे अनेकांचा जीव गेला तरीही प्रशासनाला जाग येत नाहीये अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) मुंबई कॉरिडोरवर मेहकर आणि सिंदखेड राजा दरम्यान तुटलेल्या पुलावरील खड्ड्यामुळे तसेच लोखंडी राफ्टरमुळे तीन दिवसात चार अपघात झाले आहेत.


...तर कोण जबाबदार?


मेहकर आणि सिंदखेड राजा दरम्यानच्या चेनेज क्रमांक 309 व 310 दरम्यान असलेल्या पुलावर दुरुस्तीसाठी खोदकाम करून ठेवलेले आहे. त्यामुळे पुलामध्ये वापरण्यात आलेले लोखंड वर आलेले आहे. परिणामी वाहन चालवताना अनेक अडचणी येत आहेत. गेल्या तीन दिवसांत या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. या अपघातांत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोठा अपघात झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जात आहे. समृद्धी महामार्गावरून मोठ्या वेगात वाहने धावतात. असे असताना या मार्गावरील अर्धवट राहिलेले काम अनेकांचा जीव घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


खासगी बसचा तसेच कारचा अपघात


14 जून रोजी या ठिकाणी एका खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर आज (15 जून) सकाळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सियाझ कारला भीषण अपघात झाला. या कारमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे. 


हेही वाचा :


Sheena Bora: शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट, शीनाच्या सांगाड्याचे अवशेष गायब; सीबीआयची कोर्टात धक्कादायक कबुली


मोठी बातमी : राम मंदिर बॉम्बने उडवण्याची दहशतवाद्यांची धमकी, अयोध्या अलर्ट मोडवर


नेमकं चाललंय काय? भरधाव वॅगनार कार थेट फुटपाथवर, ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार; मद्यधुंद चालकासह एका व्यक्तीला नागरिकांचा चोप