Dombivli Accident : भरधाव वॅगनार कार थेट फुटपाथवर चढवल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीतील 90 फीट रोडवर ही घटना घडलीय. ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचं समोर आलं आहे. मद्यधुंद चालकाने गाडी थेट फुटपाथवर चढवली. यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चालकासह कारमधील एका व्यक्तीला चांगलाच चोप दिला. नगिरकांनी कारचालकाला चांगलाच चोप देत डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात दिलं.


भरधाव वॅगनार कार थेट फुटपाथवर


डोंबिवलीतील 90 फीट रोडवरील कृष्णाई बंगल्यासमोर भरधाव वेगाने वॅगनार कार फुटपाथवर चढली. यावेळी स्थानिक नागरिकांनी गाडीतून चालकाला बाहेर काढलं. नागरिकांनी चालकासह कारमध्ये असलेल्या दुसऱ्या इसमाला बेदम मारहाण केली आहे, हे दोघेही दारू प्याल्याले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मद्यधुंद कारचालकाने डोंबिवली पेंढारकर कॉलेज समोर काही मोटरसायकलला धडक देत 90 फिट रोडवरील फुटपाथवर कार चढवली. यानंतर नागरिकांकडून चालकाला चांगलाच चोप मिळाला आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.


वाहनचालकांचं नेमकं चाललंय काय?


एकीकडे पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाची राज्यासह देशात चर्चा पाहायला मिळत असताना आता डोंबिवलीतही ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील अपघाताचं सुरुच असताना राज्यात इतर ठिकाणीही चालक असेच निष्काळजीपणाने ड्रायव्हिंग करताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांचा जीव मात्र, डांगणीला लागला आहे. आता डोंबिवलीमध्ये घडलेली घटनाही अशीच काहीशी आहे. चालकाने गाडी थेट फुटपाथवर चढवली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनचालकांना नेमकं झालंय काय, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.