Buldhana Crime News :  बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी येथील बस स्थानक परिसरात गाडी उभी करून मित्रासोबत चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच भोवले आहे. लक्ष ठेवून असलेल्या काही आज्ञात चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडून तब्बल 9 लाखांची रोकड पळवल्याची (Buldhana Crime News) खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना काल, 16 फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली. दिवसा ढवळ्या झालेल्या हा घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Buldhana Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ही गेल्या महिन्याभरातील अशाप्रकरची ही सहावी घटना असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात चोरट्यांच्या सुळसुळाट झाला असल्याचे चित्र असून या निमित्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.


कारची काच फोडून नऊ लाखांची रोकड लंपास


मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील रहिवासी असलेले  शिक्षक संतोष मदनलाल लद्दड ही देऊळगाव माळी येथील बस स्थानक परिसरात आपली गाडी उभी करून मित्रासोबत जवळच चहा पिण्यासाठी गेले होते. त्यापूर्वी त्यांनी दुपारच्या सुमारास मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून 9 लाख रुपयांची रोकड आपल्या खात्यातून काढली होती. ही बाब काही आज्ञातांना कळताच त्यांनी या रक्कमेवर डोळा ठेवत संतोष लद्दड यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान लद्दड हे  माळी बस स्थानक परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून जवळच चहा पिण्यास गेले असता अज्ञातांनी या संधीचा फायदा घेत गाडीच्या काच फोडून गाडीतील रोकड पळवली. त्यानंतर लद्दड हे परत गाडी जवळ आले असता त्यांना गाडीच्या काचा फुटलेल्या दिसल्या आणि त्यांनी गाडी तपासली असता त्यातील रोकड देखील गायब असल्याचे आढळून आले. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच संतोष लद्दड यांना जबर धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. 


सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू 


घडलेल्या प्रकाराची माहिती मिळातच पोलिसांनी लगेच घटनास्थाळ गाठून परिसराची पाहणी केली. तपासणी दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,  त्यामध्ये एक मोटरसायकस्वार आढळून आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. मात्र गेल्या महिनाभरात अशाप्रकरची ही सहावी घटना असल्याने बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे. सोबतच बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आसल्याचे देखील बोलले जात असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या