Buldhana Crime News : भर रस्त्यात एका स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्याकडील वसुलीचे रोख 27 लाख रुपये अज्ञात दरोडेखोरांनी(Buldhana Crime News) लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना खामगाव जालना महामार्गावर अंढेरा ते वाकी खुर्द फाट्यानजीक घडली आहे. चाकूसह अन्य शस्त्रांचा (Crime News) धाक दाखवत 7 ते 8 अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने हे कृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन आठवड्यात रस्ता अडवून लुटीमार केल्याची ही पाचवी घटना असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मात्र बुलढाणा (Buldhana Police) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहेत.


चाकूचा धाक दाखवत 27 लाखांची रोकड केली लंपास


स्टीलसाठी प्रसिद्ध असलेल्या एका कंपनीचे कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांकडून स्टील कंपनीची वसुली करून जालना कडे जात होते. दरम्यान, 14 फेब्रुवारीच्या रात्री एमएच-21-बीव्ही- 7167 क्रमांकाच्या वाहनाने चिखलीकडून जालन्याकडे जात असताना अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अज्ञात इसमानी कार थांबवून वाहन चालक आणि या कर्मचाऱ्याची अडवणूक केली. त्यानंतर या दोघांनाही धमकावत विचारपूस सुरू केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना चाकू आणि अन्य शस्त्रांचा धाक दाखवत त्या दोघांना दोरीच्या साह्याने बांधून घेतले आणि त्यांच्याकडे असलेले सत्तावीस लाख रुपये लांबविले आहेत.


पोलिसांची पाच पथके तैनात 


रक्कम ताब्यात घेतल्यानंतर या अज्ञात दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर कर्मचारी आणि वाहनचालक यांनी स्वतःला सावरत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी हाक दिली आणि त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अंढेरा पोलीस स्टेशनचे डीवायएसपी मनीषा कदम, अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यावेळी श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी रात्रीच परिसर पिंजून काढला. पण चोरट्यांचा काही माग काढता आला नाही.


या प्रकरणाच्या तपासासाठी अंढेरा पोलिसांची तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके स्थापन करण्यात आली असून, या रोडरॉबरी करणाऱ्यांचा ही पाच पथके माग काढत असल्याचे माहिती एसडीपीओ मनीषा कदम यांनी दिली आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यात रस्ता अडवून लुटीमार केल्याची ही पाचवी घटना असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या