एक्स्प्लोर

राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी

बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली.

बुलडाणा: शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीतून करण्यात आलं. बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली. राजा गादीवर कायम महत्त्वाचं म्हणजे राजा गादीवर कायम राहील, असंही भविष्य यावेळी वर्तवण्यात आलं. घट मांडणीत पान विडा कायम राहिल्याने, हे भविष्य वर्तवण्यात आलं. पान विडा राज्याच्या गादीचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. यावेळेला पान विडा कायम असला तरी काहीसा सुकलेला होता. त्यामुळे राजा गादीवर कायम राहिल, मात्र त्याला काही संकटाना सामोरे जावे लागेल, असा त्याचा अर्थ आहे. शेती सर्वसाधारण यंदा राज्यात पाऊस सर्वसाधारण राहील. जनतेला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही, अशी भेंडवळची भविष्यवाणी आहे. शेतकऱ्याचं उत्पादन सर्वसाधारण राहील. तसंच शेतमाल बाजार फारसे बदलणार नाहीत. शेतमालाच्या भावात खूप तेजी संभवत नाही, पावसाचं भाकीत
  • जून - साधारण पाऊस
  • जुलै - जूनपेक्षा जास्त पाऊस
  • ऑगस्ट - साधारण पाऊस, मात्र दुसऱ्या पंधरवड्यात जास्त पाऊस होईल.
  • सप्टेंबर - पाऊस कमी आणि लहरी राहिल
  • दुष्काळ संभवत नाही.
भेंडवळ पीकपाणी भाकित  
  • कापूस -उत्पादन सर्वसाधारण
  • ज्वार - सर्वसाधारण मात्र भावात तेजी शक्य
  • बाजरी - उत्पादन चांगले
  • तूर - साधारण पीक
  • मूग - साधारण पीक पण भाव तेजीत राहतील.
  • हरभरा - साधारण पीक
  • उडीद - साधारण पीक
  • तीळ - मोघम स्वरुपाचे उत्पादन
  • भादली - रोगराई राहिल
  • गहू - साधारण उत्पादन होईल
  • वाटाणा - सर्वसाधारण उत्पादन
  • शेतमाल बाजार फारसे बदलणार नाहीत, भावात खूप तेजी संभवत नाही
राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते? भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Blog Updates: महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; तर समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दा रंगला
Maharashtra Live blog updates: महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; तर समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दा रंगला
Maharashtra Mega Investment News: आंनदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
आंनदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
Vidhan Parishad Election 2026 Shivsena Eknath Shinde: विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत जोरदार लॉबिंग, 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर; एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी?
Prajakt Tanpure : अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेश करणार; फेसबुक प्रोफाईलला मामा जंयत पाटलांचा फोटो लावत भावनिक संदेश
अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं, भाजपमध्ये प्रवेश करणार; फेसबुक प्रोफाईलला मामा जंयत पाटलांचा फोटो लावत भावनिक संदेश

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Mega Investment News: आंनदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
आंनदवार्ता! राज्यात नोकरीची मोठी संधी, तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगार निर्मिती चालना
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
Embed widget