एक्स्प्लोर

सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा

मुंबई : 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील वादग्रस्त कार्टूननंतर आता पक्षात राजीनामासत्र सुरु झालं आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, संजय रायमुलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. व्यंगचित्र प्रकरणावरून जनतेचा रोष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तिघांनी आपले राजीनामे पाठवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कार्टून प्रकरणावरुन शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचं चित्र आहे.

राजीनाम्याचं वृत्त शिवसेनेने फेटाळलं :

दरम्यान शिवसेनेने राजीनाम्यांचं वृत्त फेटाळलं आहे. पक्षाकडे अद्याप कोणाचेही अधिकृत राजीनामे आलेले नाहीत, त्यामुळे शिवसेना खासदार-आमदारांनी राजीनामे दिले असं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे.

‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र

शिवसेनेचे भोकरदन तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी तालुकाप्रमुख आणि बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करुन पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन ‘सामना’चा निषेध व्यक्त केला आहे.

व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना

व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पेटवत आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात पत्रक काढून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. व्यंगचित्राप्रकरणी सुरु असलेल्या राजकारणामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. मात्र त्यांचा हा विघ्नसंतोषीपणा खपवून घेतला जाणार नाही. असंही सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.  नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे

श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी ‘सामना’च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सामनाच्या कार्यकारी संपादकांना 'कार्टून' म्हणावसं वाटतं: आशिष शेलार

‘सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच कार्टून म्हणावंस वाटतं.’ अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे कार्टूनवरुन शिवसेना आणि भाजपमध्येही जुंपली आहे.

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे

मराठा मूक मोर्चाबाबत ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील

‘शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी.’ अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. सामना’ कार्यालयांवर झालेली दगडफेक ही ‘सामना’च्या व्यंगचित्रातून झालेल्या अवमाननेविरोधात मराठा समाजाच्या संतापाचे प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘सामना’च्या व्यंगचित्रामध्ये मराठा मोर्चासह सर्वच समाजातील महिलांचाही अवमान करण्यात आल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला आहे.

इरादे मेरे हमेशा साफ होते है, संजय राऊत यांची सूचक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Embed widget