ST Worker Strike : प्रारंभी वेतनवाढ व अन्य पूरक मागण्या आणि नंतर आंदोलनाचे राजकीयकरण किंबहुना हे आंदोलन काहीसे हायजॅक झाल्यावर राज्य शासनात महामंडळाचे विलिनीकरण करा या मागणीसाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. न्यायालय, राज्य शासन, अभ्यास समिती असा या आंदोलनाचा विस्तार आहे. यामुळे हे आंदोलन, वादळात दिशा हरवलेल्या जहाजासारखे झालय की काय..? अशी शंका येत आहे . महामंडळाच्या बुलढाणा विभागाची यामुळे वाताहत झाल्याच चित्र समोर येत आहे. आधीच दीर्घकालीन लॉकडाऊन व कोरोनामुळे भयंकर तोट्यात असलेल्या बुलढाणा विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.
अंदाजे अडीच हजार कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. लालपरीवर विश्वास ठेवून बिनधास्त प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांना खासगी वाहन धारकांच्या राजरोस मनमानीला तोंड द्यावे लागले व लागत आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास दररोजचे 7 डेपोंच्या 400 शेड्युलद्वारे रोज सरासरी 70 ते 80 हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. दिवाळीसारख्या सणासुदीच्या महिन्यात दैनिक उत्पन्न 50 लाखांच्या घरात जात असे. 7 ते 20 नोव्हेंबर दरम्यानचे 13 दिवस धरले तर हा आकडा 6 कोटी 50 लाखांच्या घरात जातो. यादरम्यान तब्बल 75 कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलंय! एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आणि बरेच काही नुकसान झाले आहे.
ST Worker Strike: पोलीस संरक्षणात धुळे अगारातून बस बाहेर, कर्मचाऱ्यांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
आता आंदोलन कोणत्या दिशेला जातंय व कधी निर्णय होतो याकडे एसटी कर्मचाऱ्यांच लक्ष लागले आहे , एसटीच्या आंदोलनावर तोडगा निघून कर्मचारी व प्रवाश्याना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे अशी मागणी सामान्य जनता करत आहे.
st workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; खासगी वाहनांतून प्रवासी वाहतुकीस मंजुरी