Satara Distict Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार व उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कुडाळ येथे झालेल्या या वादामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. 


आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे. जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे संचालक म्हणून निवडून गेले आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाने यंदा शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. ज्ञानदेव रांजणे यांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, रांजणे यांनी माघार घेतली नाही. त्यानंतर आज मतदानाच्या दिवशी दोन गटात हमरीतुमरी झाली. 


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. बँकेच्या 10 जागांसाठी हे मतदान झाले. तर, 11 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, रामराजे नाईक यांचा समावेश आहे. उर्वरित 10 जागांसाठी चुरशी लढत होण्याची शक्यता आहे. 


धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेसाठी निवडणुका


धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज सतरा पैकी दहा जागांसाठी मतदान होत आहे. 17 पैकी सात जागांवर बिनविरोध निवड झाली असून आता शिल्लक राहिलेल्या दहा जागांसाठी वीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


राजकीय आखाड्यात कुस्ती, आखाड्याबाहेर दोस्ती! ऐरवी राजकीय वैर, एकत्र आले की सैरभैर!

पुणे हादरले; मित्राने 16 वर्षीय मुलासोबत केलं अनैसर्गिक कृत्य


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha