एक्स्प्लोर

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डी. एस. कुलकर्णी हे गुंतवणुकदारांचे 232 कोटी देणं लागतात, अशी त्यांनी हायकोर्टात माहिती दिलीय. त्यामुळे बुलडाणा अर्बन बँकेनं ठरल्याप्रमाणे रक्कम डी. एस. कुलकर्णींच्या खात्यात जमा करताच सर्वात आधी राज्य सरकारनं गरजू आणि पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असे निर्देश हायकोर्टानं दिलेत.

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मदतीला आता बुलडाणा अर्बन बँक धावून आल्यानं डीएसकेंना तूर्तास तरी मोठा दिलासा मिळाला आहे. बुलडाणा अर्बन बँक डीएसकेंना 100 कोटींचं कर्ज देण्यास इच्छुक आहे. तसेच त्यांची विकण्यास योग्य असलेली 12 कोटींची संपत्तीही विकत घेण्यास उत्सुक असल्याचंही बँकेच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयातील डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला असून, 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय यावर आपला अंतिम फैसला सुनावणार आहे. दरम्यान मंगळवारी अखेरच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं फटकारलं. इतके दिवस जी मागणी केली नाहीत ती आता शेवटी का करताय? असा सवालही हायकोर्टानं विचारला. दरम्यान, कबुल केल्याप्रमाणे आजच्या सुनावणीतही डी. एस. कुलकर्णी 50 कोटी जमा करण्यात अपयशी ठरले. मात्र हायकोर्टानं यावर काही बोलायच्या आतच डी. एस. कुलकर्णींच्या वतीने बुलडाणा अर्बन बँकेचा प्रस्ताव कोर्टापुढे ठेवण्यात आला. यावर हायकोर्टानं स्पष्ट केलंय की, हा प्रस्ताव प्रभुणे इंटरनॅशनलच्या आश्वासनाप्रमाणे फोल ठरु नये यासाठी आमच्यासमोर ठोस पुरावे सादर करा. 17 फेब्रुवारीपर्यंत बुलडाणा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात डीएसकेंबाबतचा ठराव संमत केल्याचं पत्र तपासयंत्रणा या नात्यानं पुणे ईओडब्ल्यू आणि हायकोर्टाला 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असे निर्देश बुलडाणा अर्बन बँकेला देण्यात आलेत. दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णी हे आपली पत्नी हेमंती यांच्यासह जातीनं कोर्टापुढे हजर होते. या दोघांव्यतिरीक्त त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनीही हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. काही गुंतवणुकदारांनी या सुनावणीत हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला तर काही वैयक्तिक गुंतवणुकदारांनी कोर्टापुढे आपली गाऱ्हाणी मांडण्याचा प्रयत्न केला. यावर हायकोर्टानं पुन्हा एकदा त्यांना समजावलं की, स्वत:च्या गाडीत बसून तपासयंत्रणांपुढे जाणं सोप्प आहे, मात्र कोर्टात येऊन डीएसकेंना यासाठीच उभं केलंय की त्यांनी पाहावं की, इथं दाद मागायला आलेल्या त्यांच्या गुंतवणूकदारांची काय अवस्था झालीय, ते त्यांच्यासाठी जास्त अपमानकारक आहे, असं हायकोर्टानं म्हटलं. डी. एस. कुलकर्णी हे गुंतवणुकदारांचे 232 कोटी देणं लागतात, अशी त्यांनी हायकोर्टात माहिती दिलीय. त्यामुळे बुलडाणा अर्बन बँकेनं ठरल्याप्रमाणे रक्कम डी. एस. कुलकर्णींच्या खात्यात जमा करताच सर्वात आधी राज्य सरकारनं गरजू आणि पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असे निर्देश हायकोर्टानं दिलेत.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget