एक्स्प्लोर

संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार: बुधाजीराव मुळीक

पुणे: 'शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.' अशी घोषणा शेतकरी नेते डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनासाठी ज्या 21 जणांची नवी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात बुधाजीराव मुळीक यांचाही समावेश आहे. ते आज पुण्यात बोलत होते. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालास उत्पादन खर्चाच्या आधारित कायद्याने हमीभाव, शेतकऱ्यांना पत्नीसह निवृत्तीवेतन कायदा आणि शेती उत्पन्नातील जोखमीचे व्यवस्थापन कायदा करणे. या चार मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्या. अशी मागणी यावेळी बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. 'कर्जमुक्ती करण्यासाठी वेळ लावायची गरज नाही. सध्या राज्यात कांद्यापेक्षा रद्दीचा दर जास्त आहे.' अशी टीकाही मुळीक यांनी यावेळी केली. 'उदयनराजे भोसलेही आंदोलनात सहभागी होणार' दरम्यान, 'उदयनराजे भोसले यांचा देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून आठवडाभरात उदयनराजे स्वत: आंदोलनात सहभागी होतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतील.' असंही मुळीक यांनी यावेळी सांगितलं. पुणतांब्यातील आंदोलनाचा उद्या शेवटचा दिवस, शेतकरी मौन आंदोलन करणार: दुसरीकडे पुणतांब्यानं पुकारलेल्या संपाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. सरकार बहिरं असल्यानं, उद्या मौन आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. तसेच आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीच्या बैठकीनंतर ठरवणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.  आता सुकाणू समितीनं आंदोलन सुरुच ठेवण्याची घोषणा केल्यानं पुणतांब्याचे आंदोलक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी जीएसटीप्रमाणे विशेष आंदोलन बोलवावे अशी मागणीही आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास, पुन्हा एकदा सर्व गटतट विसरुन पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. संंबंधित बातम्या: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फायदा परराज्यातील शेतकऱ्यांना! साताऱ्यातील बोरगाव बुद्रुक... कर्ज फेडणारं गाव! राज्यभरात शेतकऱ्यांचं टाळेठोक आंदोलन LIVE UPDATE : शेतकरी संपाचा सहावा दिवस, भाजीपाला महागला पुणतांब्यातील आंदोलनाचा उद्या शेवटचा दिवस, शेतकरी मौन आंदोलन करणार शेतकरी संपाचा दिल्लीत आवाज, शरद पवार मोदींच्या भेटीला!

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
Embed widget