एक्स्प्लोर

दानवेंच्या घरात साप सोडण्याचा इशारा, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. घराच्या सुरक्षेसाठी अगोदर सहा पोलीस तैनात होते. आता 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. घराच्या सुरक्षेसाठी अगोदर सहा पोलीस तैनात होते. आता 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गेल्या 20 वर्षात दानवे यांनी मराठा समाजासाठी काय योगदान दिलं? असा प्रश्न बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. जालना शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने एक ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला. राज्यात आंदोलन सुरुच आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलन सुरुच आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तर पालघरमध्येही मराठा संघटनांकडून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या परळीतल्या ठिय्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे काल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक घोषणा देत असताना स्वतः खासदार काकडेही त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी देखील घोषणा दिल्या. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येतं असलेली लोकप्रतिनिधींच्या घरासमोरची आंदोलनं ही स्टंट आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांच्या या वक्तव्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे आक्षेप घेण्यात आला. परळीतील आंदोलनाचा 19 वा दिवस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. आंदोलनकर्ते मराठा आरक्षण आणि मेगा भरती रद्द करा या मागणीवर ठाम आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivasi Protest Mantralay : आदिवासी  आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्याPM Narendra Modi Pohradevi Visit : पंतप्रधान मोदींच्या पगडीची EXCLUSIVE दृश्य ABP MajhaवरChandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हाUday Samat On Rohit Pawar : दावोस दौऱ्यात जास्त खर्च केल्याची नोटीस आलीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
Pune News : पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
Embed widget