एक्स्प्लोर

Maratha Reservation : ब्रिटिशांनी केवळ करवसुलीसाठी मराठ्यांची प्रगत वर्गात नोंद केली होती : मराठा महासंघ

ब्रिटीशांनी केवळ करवसुलीसाठी मराठा समाजाची प्रगत वर्गात नोंद केली होती, असा दावा आज (मंगळवारी) मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला.

मुंबई : ब्रिटीशांनी केवळ करवसुलीसाठी मराठा समाजाची प्रगत वर्गात नोंद केली होती, असा दावा आज (मंगळवारी) मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. आजवर झालेल्या सर्व आयोगांमध्ये सध्याच्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल परीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे, याचा पुनरूच्चारही करण्यात आला. आज मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीवेळी मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी त्यांची बाजू मांडली. यावेळी याचिकार्ते म्हणाले की, "मराठा समाज मागास नसल्याची शिफारस बापट आयोगाने केली असली तरी प्रत्यक्षात मात्र आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणाचा ठळकपणे उल्लेख आहे. त्यावर सदस्यांमध्ये मतभेदही झाले होते. मराठा आरक्षणाबाबत यापूर्वीच्या मंडल आयोग (1990), खत्री आयोग (2001), राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोग (2000) आणि बापट आयोगाने (2008) मराठा समाजाकरता आरक्षणाच्या विरोधात निष्कर्ष नोंदविला, असे सांगितले जाते. परंतु त्यात तथ्य नाही, असा दावा मराठा आरक्षणाच्या समर्थक याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जेष्ठ विधीज्ज्ञ विनित नाईक यांनी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे आपली बाजू मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या शास्त्रीय आणि गुणात्मक अहवालामध्ये केली आहे. मंडल आयोगाने ब्रिटीश काळातील जनगणनेनुसार (साल 1931) विविध समाजघटकांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत. तर खत्री आणि राष्ट्रीय आयोगांनीही तीच पद्धत वापरुन आरक्षणाला विनाअभ्यास आणि कोणतीही पाहणी न करता विरोध केला होता, असा आरोप याचिकार्त्यांकडून करण्यात आला. बापट आयोगामधील सात सदस्यांमध्ये मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाबाबत मतभिन्नता होती. त्यावरुन त्यांनी निष्कर्षाबाबत सर्व सदस्यांचे मत विचारात घेतले होते. सातपैकी दोन सदस्यांनी आरक्षणाची गरज असल्याचे म्हटले होते, त्यामुळे बापट आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा मुद्दा विचारात घेतला होता. तसेच त्यामध्ये आरक्षणची आवश्‍यकता असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु अंतिम शिफारसींमध्ये अधिकतेच्या प्रमाणानुसार तसे दाखविण्यात आले नाही, याची नोंद घ्यायला हवी, असा दावा विनित नाईक यांनी केला. यापूर्वीच्या आयोगांनी कोणतीही अभ्यासपूर्ण पद्धत न वापरता केवळ उपलब्ध माहिती वापरुन आरक्षणाविरोधात भूमिका मांडली होती. परंतु गायकवाड आयोगाने केलेल्या गुणवत्तापूर्ण सर्व्हेक्षणामुळेच या समाजाचे मागासलेपण अधिक ठळकपणे जाणवते, अशी माहीती मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget