मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज ठाकरेंची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदराज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये महाआरती केली. मशिदींचे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन राज्यातील राजकारण तापलं असताना राज ठाकरेंवर अनेकांकडून टीका केली जातेय. त्या टीकेला आज राज ठाकरे उत्तर देणार असून त्यासंबंधी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे.
आज मुंबईत मेगाब्लॉकमध्य रेल्वेवरील अपघातामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आजही प्रवाशांचे मेगा हाल होऊ शकतात. मध्य रेल्वेने आज मेगा ब्लॉक घेतला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावरील गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
जम्मूमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकजम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक जवान शहीद झाला. अजूनही या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. प्रशांत किशोर आणि काँग्रेसमध्ये महत्वाची बैठककाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे झालेल्या एका हायप्रोफाईल बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंबंधी चर्चा झाली आहे. यावर प्रशांत किशोर यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीत राजकीय पक्षांना सल्ला देणारी खाजगी संस्था IPAC चे माजी प्रमुख प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसमोर PPT Presentation केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी त्यांची योजना स्पष्ट केली. या बैठकीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटनी, अंबिका सोनी, जय राम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, अजय माकन आणि केसी वेणू गोपाल हेही उपस्थित होते.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा कर्नाटक दौऱ्यावरभाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
मॉरिशसचे पंतप्रधान भारत दौऱ्यावरमॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे त्यांच्या पत्नीसोबत दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा 24 एप्रिलपर्यंत असणार आहे.
'हुनार हाट'च्या 40 व्या कार्यक्रमाचे आज मुंबईत उद्धाटनकेंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या आणि स्थानिक कारागिरांना तसेच शिल्पकारांच्यां कलेला संरक्षण देणाऱ्या 'हुनार हाट'च्या 40 व्या कार्यक्रमाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहे.
आएपीएलच्या आज दोन लढती आहेत,
IPL 2022, PBKS vs SRH : आज रंगणार पंजाब विरुद्ध हैदराबादयंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना दुपारी तीन वाजता वेळेत होणार आहे, त्यामुळे उष्णता अधिक असल्याने दवाची अडचण अधिक होणार नाही. दवाची अडचण नसल्याने नाणेफेक आजच्या सामन्यात मोठा प्रभाव पाडणार नसल्याचं ही तज्ज्ञांचं मत आहे.
PBKS vs SRH, Head to Head : गुजरात विरुद्ध चेन्नईमध्ये रंगणार आजची लढतही लढत संध्याकाळी साडेसात वाजता पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. गुजरात आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे तर चेन्नईचा संघ दुसऱ्या विजयासाठी दोन हात करणार आहे.
